॥ मात्रा मोजण्याचे ढोबळ नियम ॥
‘मात्रा’ म्हणजे काय?
एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो, त्यास मात्रा असे म्हणतात.
लक्षात ठेवा
- र्हस्व उच्चार = लघु (U) = 1 मात्रा
- दीर्घ उच्चार = गुरु (_) = 2 मात्रा
लघु व गुरु अक्षरांची यादी
लघु अक्षरे
1 मात्राअ, इ, उ, ॠ
क, कि, कु, कृ
गुरु अक्षरे
2 मात्राआ, ई, ऊ, ए, ऐ
ओ, औ, का, की, के
कै, को, कौ
उदाहरण
म ना स | ज्ज ना भ | क्ति पं थे | चि जा वे
U _ _ U _ _ U _ _ U _ _
७ महत्वाचे नियम
१
लघु (U) अक्षर = 1 मात्रा
उदा: म = 1 मात्रा
२
गुरु (_) अक्षर = 2 मात्रा
उदा: ना = 2 मात्रा
३
लघुवर आघात = गुरु
उदा: सज्जना – “स” वर “ज्ज” आघात = 2 मात्रा
४
जोडाक्षर प्रमाणेच मोजा
उदा: “ज्ज” लघु = 1 मात्रा
५
अनुस्वार स्पष्ट असल्यास = गुरु
उदा: पंथेचि – “पं” = 2 मात्रा
६
विसर्ग असल्यास मागील अक्षर = गुरु
उदा: दु:ख – “दु” = 2 मात्रा
७
ए, ऐ, ओ, औ = सर्व गुरु
उदा: ओढा, औषध – 2 मात्रा
